बीडमधील पोलिस शिपायावर अखेर लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - अनेक महिन्यांपासून लिंग परिवर्तनाच्या प्रतीक्षेत असलेल्या बीड येथील पोलिस शिपाई ललिता साळवे यांना अखेर दिलासा मिळाला. त्यांच्यावर आज सेंट जॉर्ज रुग्णालयात यशस्वी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता ललिताचे रूपांतर ललितमध्ये झाल्याने सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे आयुष्य जगण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

ललितावर लिंग परिवर्तनाची पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. रजत कपूर यांनी सांगितले, की ललिता ही जन्मतःच पुरुष असल्याने तिच्या लहान जननेंद्रियावर शस्त्रक्रिया केली गेली. त्यामुळे आता पुरुषांप्रमाणे मूत्रविसर्जन करता येईल. शस्त्रक्रिया विभागात आज तिला सकाळी दाखल करण्यात आले. दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्लॅस्टिक सर्जरी विभागातील डॉक्‍टर, भूलतज्ज्ञ डॉ. संतोष गीते व तीन सदस्यांच्या पथकाच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया पार पडली.

तीन किंवा सहा महिन्यांच्या कालावधीनंतर उर्वरित शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

ललिताला शस्त्रक्रियेच्या काही तासांनंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अजून तीन दिवस भेटता येणार नाही. संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च एक लाखाच्या आत जाईल. उपचार आणि औषधांवरील खर्च रुग्णालय करणार आहे.
- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

Web Title: lalita salve penis changes surgery