लालूप्रसाद यादव मुंबईतील रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव बुधवारी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मुंबई - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव बुधवारी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयात दाखल झाले आहेत.

लालूप्रसाद यांच्यावर काही वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. मुंबईत ते प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रमाकांत पांडा यांचा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. येथे त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. लालू यांच्यासोबत मुलगा तेजप्रताप यादव, सून ऐश्‍वर्या आणि मुलगी मिसा भारती मुंबईत दाखल झाले आहेत. चारा गैरव्यवहारप्रकरणी झारखंड येथील उच्च न्यायालयाने लालू यांना शिक्षा सुनावली आहे. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना सहा आठवड्यांची सवलत देण्यात आली आहे.

Web Title: laluprasad yadav admit in hospital