खंडाळा घाटात रेल्वे रुळावर कोसळली दरड

खंडाळा घाटात रेल्वे रुळावर कोसळली दरड

खंडाळा : खंडाळा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळली. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन लाईनची वाहतूक ठप्प झाली. ठाकूरवाडी ते मंकी हिलदरम्यान 117 वर भला मोठा दगड रेल्वे रुळावर कोसळला.

दरड कोसळल्याने सह्याद्री एक्स्प्रेस सध्या घाटात उभी आहे. ही घटना आज (गुरुवार) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरड कोसळल्याने वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.  

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com