माथेरान राणीच्‍या मार्गात दरड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

माथेरानच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नेरळ-माथेरान घाटरस्त्यात दररोज दरडींसह झाडे कोसळत आहेत. या पावसाचा फटका काल मिनी ट्रेनच्या मार्गाला बसला. या मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे मालगाडीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. 

मुंबई : माथेरानच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नेरळ-माथेरान घाटरस्त्यात दररोज दरडींसह झाडे कोसळत आहेत. या पावसाचा फटका काल मिनी ट्रेनच्या मार्गाला बसला. या मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे मालगाडीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. 

माथेरानमध्ये 26 जुलैपासून दररोज किमान 400 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे माथेरानचे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता दरडी कोसळून विस्कळित होत आहे. या पावसाचा फटका मिनी ट्रेनच्या नॅरोगेज मार्गालाही बसला आहे. या मार्गात दरड कोसळली आहे. त्यामुळे नेरळ येथून माथेरानपर्यंत धावणाऱ्या मालगाडीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. 

दरम्यान, मिनी ट्रेनची शटल सेवा अमन लॉज ते माथेरानदरम्यान चालवली जात आहे. या शटल सेवेमुळे पावसाळी पर्यटन माथेरानमध्ये बहरले असून शटल सेवेच्या फेऱ्यांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landside at mini train route