पवईत दरडींचा धोका कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

शिवडी - पवईतील डोंगराळ भागावरील वस्तीमध्ये संरक्षक भिंत व दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रहिवासी िभतीच्या छायेत आहेत. २५ वर्षांच्या जुन्या संरक्षक भिंतीची डागडुजी करावी किंवा नवीन भिंत बांधण्याची मागणी दोन वर्षांपासून पवईतील युथ पॉवर संघटनेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे; मात्र महापालिका आणि म्हाडा संरक्षक भिंत एकमेकांवर जबाबदारी झटकून मोकळे होत आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पवईतील इंदिरानगर आणि गौतमनगरमधील २५ वर्षे जुन्या संरक्षक भिंती व दरडी कोसळण्याचे सत्र तीन वर्षांपासून सुरूच आहे. मात्र, ये-जा करण्यासाठी तो एकच मार्ग असल्याने रहिवाशांना जीव मुठीत घेऊन तेथून प्रवास करावा लागतो. यूथ पॉवर संघटना दोन वर्षांपासून संरक्षक भिंत बांधण्यासाठी आणि दरडींवर जाळ्या लावण्यासाठी पाठपुरावा करत आहे. मात्र, महापालिका आणि म्हाडाने पाठपुराव्याला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप होत आहे. यूथ पॉवर संघटनेने म्हाडा आणि महापालिकेला पत्र देऊन पवईतील डोंगराळ भागावरील संरक्षक भिंत नव्याने बांधण्याची मागणी केली आहे; परंतु ते काम आमच्या अख्यत्यारित्या येत नाही, असे पालिकेतर्फे सांगण्यात आल्याचे संघटनेचे मुंबई अध्यक्ष वीरेंद्र धिवर यांनी सांगितले. दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल होत आहे. 

म्हाडाशी पत्रव्यवहार
इंदिरानगर, गौतमनगर, शिवनेरी हिल, मोरारजीनगर, देवीनगर, गरीबनगर, हरी ओमनगर, स्वामी नारायणनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर ग्रुप २ आदी धोकादायक ठिकाणे पालिकेच्या अंतर्गत येत नाहीत. त्यामुळे तिथे सर्वेक्षण करून संरक्षक भिंत बांधण्यात येण्याबाबतचे पत्र म्हाडाला देण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका एस विभाग सहायक अभियंत्याने दिली.

Web Title: landslide risk persists in pawai