ठाण्यात घरावर दरड कोसळून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

दरड जवळच्या काही घरांवर पडली आण या ढिगाऱ्याखाली तिघे अडकले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे. बीरेंद्र जसवार (वय 40) आणि सनी जसवार (वय 10) अशी मृतांची नावे आहेत.

ठाणे : ठाण्यातील कळवा या ठिकाणी असलेल्या चाळीवर दरड कोसळली. यात  दोघांचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे. कळवा येथील अटकोनेश्वर नगर या ठिकाणी असलेल्या ज्ञानगंगा शाळेजवळच्या चाळीवर दरड कोसळली.

दरड जवळच्या काही घरांवर पडली आण या ढिगाऱ्याखाली तिघे अडकले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे. बीरेंद्र जसवार (वय 40) आणि सनी जसवार (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही एकाच कुटुंबातील आहेत. नीलम जसवार या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान तिघांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे दोघांना मृत घोषित करण्यात आलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide at thane and 2 dies from same family