भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी दिलीप धोंडगे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - राज्य सरकारने भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. दिलीप धोंडगे यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे 33 सदस्यांची नियुक्तीही केली आहे.

मुंबई - राज्य सरकारने भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. दिलीप धोंडगे यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे 33 सदस्यांची नियुक्तीही केली आहे.

राज्य सरकारने भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना केली असून, समीक्षा आणि संशोधन अशा दोन्ही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. दिलीप धोंडगे यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांनी संत साहित्य, वारकरी परंपरा यांचा समकालाशी नव्याने अन्वयार्थ लावण्याचे काम केले आहे.

नवनियुक्त सदस्यांची नावे - जोसेफ तुस्कानो, डॉ. राजेंद्र माने, मीना वैशंपायन, पुष्पा गावित, स्वाती राजे, डॉ. मंगला ठोंबरे, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. स्नेहल तावरे, डॉ. गंगाराम नामगवळी, प्रा. संजय साळवे, शरद माकर, महादेव गायकवाड, प्रा. दिलीप गोटखिंडीकर, अविनाश बिनीवाले, डॉ. प्रकाश परब, अनिल मोरे, डॉ. गिरीश दळवी, माधव जोशी, ऍड. दीपक गायकवाड, डॉ. संतोष क्षीरसागर, श्‍यामसुंदर जोशी, डॉ. केशव देशमुख, अतुल कहाते, डॉ. एकनाथ पगार, डॉ. गणेश चंदनशिवे, विश्‍वास कुरुंदकर, विवेक कवठेकर, डॉ. राजेंद्र नाईकवडे, प्रा. वैजनाथ महाजन, शिवाजी कांबळे, डॉ. कुमार शास्त्री, विष्णू सोळंके.

Web Title: Language Advisory Committee Chairman Dilip Dhondage

टॅग्स