अंगारकीयोग निमित्त अष्टविनायक क्षेत्र महड येथे भाविकांची मोठी गर्दी

अनिल पाटील
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

खोपोली - डिसेंबर मंगळवार रोजी, अंगारकी चतुर्थी निमित्त खालापुर तालुक्यातील महड अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी चार वाजता महाआर्ती झाल्यापासून लागलेल्या गणेश भाविकांच्या रांगा उशीरा पर्यंत कायम राहिल्या. मंदिर व्यवस्थापन कमिटी व पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दुपारी ऐक वाजेपर्यंत 60 ते 70 हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले असून, लागलेली लांबच लांब रांग बघता, आजच्या पवित्र दिवशी दिड लाखाच्या आसपास गणेश भक्त वरदविनायकाचे दर्शन घेतील. 

नाताळ व ख्रिसमस निमित्ताने पडलेल्या सुटयां, त्यात आलेली अंगारकी चतुर्थी निमित्ताने अष्टविनायक क्षेत्र महड येथील वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सकाळ पासूनच गणपती संस्थान स्वागत कमानी बाहेर भक्तांची रांग लागली .दुपारनंतर ही रांग वाढून महड वळण रस्त्यापर्यंत पोहली होती. या गर्दीमुळे मुंबई –पुणे महामार्गावर मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी ही झाल्याचे दिसले. अंगारकी चतुर्थी निमित्त महड मंदिरात कडधान्य, विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी,फुलांची आरास व मन प्रसन्न होईल अशी सजावट करण्यात आली होती. अंगारकी निमित्त बाप्पाचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून श्री. क्षेत्र महड देवस्थान व्यवस्थापण कमिटीच्या कार्यवाह मोहिनी वैद्य व वरिष्ठ सदस्य केदार जोशी  यांच्या मार्गदर्शनाखाली, व्यवस्थापन कमिटी कार्यमग्न होती. खालापूर पोलीस, स्थानिक नागरिकांनी आप – आपल्या स्तरावर सोयी सुविधा उपलब्ध केल्याचे दिसले. मंदिर व्यवस्थापक राजेंद्र बडगुजर यांची टीम व येथे बंदोबस्तसाठी नियुक्त पोलीस कर्मचारी सतत सज्ज होते. 

दरम्यान खोपोलीतील शांतीनगर येथील ओझा गणपती मंदिर, काटरंग येथील सिद्धिविनायक मंदिर व खालापुर तालुक्यातील विविध गांवातील गणेश मंदिरातही अंगारकी निमित्त भजन, आरती, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम मोठ्या भक्ति भावाने संपन्न झाले.

Web Title: A large crowd of devotees at the Ashtavinayak area