esakal | दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी; नागरिकांनी सोडली कोरोनाची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी; नागरिकांनी सोडली कोरोनाची भीती

नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे का असा प्रश्न पडावा अशी चित्र पनवेल परिसरातील विविध भागात खरेदीकरता झालेल्या गर्दी वरून पाहायला मिळाले आहे

दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी; नागरिकांनी सोडली कोरोनाची भीती

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल - नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती नाहीशी झाली आहे का असा प्रश्न पडावा अशी चित्र पनवेल परिसरातील विविध भागात खरेदीकरता झालेल्या गर्दी वरून पाहायला मिळाले आहे.कोरोनाच्या संसर्गाच्या पार्शवभूमीवर आलेल्या दीपोत्सव काळात नागरिकांनी कमीत कमी प्रमाणात घराबाहेर पाडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून सुद्धा सर्वत्र गर्दीच गर्दी चोहीकडे असे चित्र पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये कोरोनाची भीतीच राहिली नसल्याने अनेकजण मास्क न लावताच घरा बाहेर पडत आहेत.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाबाबत सरकार पळ काढते आहे; प्रवीण दरेकर यांची टीका

पनवेल पालिका हद्दीत सध्या कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून मृतांची संख्या देखील आटोक्यात आल्याचे पालिके मार्फत देण्यात येणाऱ्या मागील पाच दिवसांच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.मागील पाच दिवसात पालिका हद्दीत केवळ 274 कोरोनाचे रुग्ण सापडले असून 2 घा नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दोनच महिन्या पूर्वीची आकडेवारी पाहता हे प्रमाण निम्यावर आले असले तरी कोरोनाचा धोका कुठेही कमी झालेला नसून,सावधानता न बाळगल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार राजभवन

गर्दीची ठिकाणे 
शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या गर्दी होत असून,भाजी मार्केट तसेच शहरातील प्रमुख रस्ते गर्दीने फुलून जात आहेत. चौकाचौकांमधील दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडते आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. सुरक्षित अंतर धोरण शहरभरात सगळीकडे पायदळी तुडवण्यात येत आहे.प्रवासी वाहनांमध्ये शमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात आहे.

पनवेल पालिका हद्दीत सद्य स्थितीत 455 कोरोनाचे रुग्ण असून,563 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पालिका हद्दीत गुरवार पर्यंत सापडलेल्या रुग्णांचा आकडा 24 हजार 268 इतका असून 23 हजार 250 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी पणे मात केल्याने रुग्ण बरे होण्याची सरासरी 95.81 इतके आहे.

Large crowds in markets for Diwali shopping Citizens let go of Coronas fears

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top