विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाचा "डबलबार' 

विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाचा "डबलबार' 

ठाणे : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून ढोलताशे आणि डीजेंचा धिंगाणा ठाण्यात दिसून आला. मुख्य शहरात तर ध्वनिप्रदूषणाची पातळी जवळपास दुप्पट म्हणजेच 100 डेसिबल्सच्या आसपास पोहचलेली होती. गणेशोत्सवात "ध्वनिप्रदूषण टाळा' अशी पालिकेने केलेली जाहिरातबाजी आणि कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही त्याचा कोणताही परिणाम विसर्जन मिरवणुकांमधल्या आवाजावर झालेला दिसला नाही. 

उत्सवांत होणारे ध्वनिप्रदूषण आणि अन्य बेकायदा बाबींच्या विरोधात हायकोर्टात लढा देणारे डॉ. महेश बेडेकर यांनी शनिवारी विसर्जन मिरवणुकांदरम्यान ठिकठिकाणच्या आवाजाची पातळी मोजली. राम मारूती रोड, गोखले रोड, मासुंदा तलाव परिसर आणि कोपरीतल्या विसर्जन घाटाजवळ बेडेकर यांनी संध्याकाळी साडे पाच ते रात्री 11 या वेळात प्रत्येकी तीन वेळा आवाजाची पातळी मोजली. प्रत्येक ठिकाणी 90 ते 100 डेसिबल्सच्या आसापास प्रदूषणाची पातळी नोंदविली गेल्याचे बेडेकर यांनी सांगितले.

तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानेदेखील हॉर्नच्या वाजामुळेदेखील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे निरीक्षणही त्यांनी या वेळी नोंदवले. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे यंदा शहरातून मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणुका निघत नसल्या तरीदेखील, ज्या मिरवणुका निघाल्या त्यांनी शहरात कमालीचे ध्वनिप्रदूषण केले.

निप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणारे डॉ. महेश बेडेकर यांनी शहरामध्ये सर्वेक्षण करून आवाजाची पातळी मोजली. त्यावेळी शहराच्या सगळ्याच भागांमध्ये किमान 85 ते 90 आणि कमाल 90 ते 95 डेसिबल आवाजाची पातळी असल्याचे उघड झाले. ठाणे महापालिकेचे मुख्यालय आणि राम मारूती रोड परिसरात मध्यरात्री 11 पर्यंत 95 डेसिबल आवाजाची नोंद झाल्याने बेडेकर यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

यालयाकडून पोलिसांना ध्वनिप्रदूषणाची पातळी राखण्याबद्दलचे निर्देश असतानाही कायद्याचे पालन होत नसल्याचे यातून स्पष्ट होत होते. कोणत्याही ठिकाणी पोलिसांकडून आवाज करणाऱ्या मंडळांना थांबवल्याचेही समोर आले नाही. पोलिसांकडूनच रोखण्यास पुढाकार घेतला जात नसल्यामुळे मंडळांना ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढवण्यास मोकळीक मिळाली होती. यंदा पोलिसांकडून मंडळांना कडक निर्बंधांचे पत्र किंवा जाहीर सूचनाही दिल्या नसल्याने मंडळांचा आवाज कमालीचा वाढल्याचे समोर आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com