ब्रेडमध्ये सापडल्या अळ्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

दुकानातून आणलेल्या ब्रेडमध्ये जिवंत अळ्या सापडल्याची घटना कळव्यात घडली आहे. यामुळे पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ठाणे - दुकानातून आणलेल्या ब्रेडमध्ये जिवंत अळ्या सापडल्याची घटना कळव्यात घडली आहे. यामुळे पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

कळवा पारसिकनगर येथील स्नेहा पार्क येथे राहणारे तुकाराम म्हस्करे यांनी शुक्रवारी दुकानातून ब्रेडचे पाकीट आणले होते. शनिवारी सकाळी नाश्‍ता करण्यासाठी हे पाकीट उघडले असता ब्रेडमध्ये मोठमोठ्या जिवंत अळ्या आढळल्या. त्यांनी तातडीने मित्र अक्षय सिंगला सोबत घेऊन दुकान गाठले आणि दुकानदाराकडे विचारणा केली असता आमच्याकडे ब्रेडची बंद पाकिटे येतात. त्यामध्ये अळ्या कशा आल्या, याविषयी आम्ही काहीच सांगू शकत नसल्याचे उत्तर दुकानदाराने दिले; मात्र यापूर्वीही दोनतीन वेळा ब्रेडमध्ये अळ्या आढळल्या होत्या, असे अक्षय सिंग यांनी सांगितले. त्यांनी याबाबत स्पेशल बटर मार्केट कंपनीकडे तक्रार केल्यानंतर शनिवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी म्हस्करे व सिंग यांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. 
 

Web Title: Larvae found in bread

टॅग्स