'माझा'मध्ये सापडल्या अळ्या ; दुकानमालकास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कल्याण : कल्याण पूर्व नांदिवली पार्वती तुलसी पार्क येथे 'माझा' या शीतपेयात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शीतपेय विकणाऱ्या दुकानदारास पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. 

गणेश जाधव याने शनिवारी दुपारी माझा हे शीतपेय तुलसी पार्कसमोरील आकाश किराणा स्टोअर्समधून खरेदी केले. बॉटल खोलून पिण्याचा प्रयत्न करताच बॉटलच्या झाकण आणि पेयामध्ये अळ्या सापडल्या. याबाबत त्याने दुकानदाराला जाब विचारला असता त्याने वितरकाकडे बोट दाखवले. त्यानंतर वितरकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर गणेश जाधव याने कोळशेवाडी पोलिसांना घडलेला प्रकार कळविला. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुकानमालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिवसेंदिवस शीतपेयांमध्ये अळ्या सापडण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी अन्न व औषध विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

Web Title: The larvae found in Mazza The shopkeeper arrested