भीती कायम! गेल्या 24 तासांत मुंबईत पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर;वाचा इतर सविस्तर आकडेवारी

भीती कायम! गेल्या 24 तासांत मुंबईत पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या वर;वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मुंबई : मुंबईत आज 1200 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 1,27,571 झाली आहे.मुंबईत आज 48 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 6,988 वर पोचला आहे. मुंबईत आज 884 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 79 टक्के इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 48 मृत्यूंपैकी 33 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 30 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 48 रुग्णांपैकी चौघांचे वय 40 वर्षा खालील होते. 35 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 9 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 884 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,00,954 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 87 दिवसांवर गेला आहे. तर 12 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,29,899  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  6 ऑगस्ट  ते 12 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.80 इतका आहे. 

मुंबईत 602 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,552 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,674 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,949 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com