महागाई, पावसाचे विघ्न पार करत विघ्नहर्ता तयार

विक्रमगड ः मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तीकार.
विक्रमगड ः मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तीकार.

विक्रमगड ः वाढती महागाई, रंगांच्या किमतींमधील वाढ, वातारणातील बदल, अतिवृष्टीमुळे वारंवार खंडित होणारी वीज आणि कमी होत असलेले मूर्तिकार ही सर्व विघ्ने पार करत गणराय विराजमान होण्यासाठी तयार झाले आहेत. मूर्तिकारांनी बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. विक्रमगड आणि परिसरातील मूर्तिकार वेगाने कामाला लागले असून त्यांची लगबग सुरू आहे. 

विक्रमगड शहराच्या पूर्व विभागातील मूर्तिकार एकनाथ लक्ष्मण व्यापारी आणि त्यांचे वडील लक्ष्मण व्यापारी हे पूर्वापार चालत आलेला व्यवसाय कित्येक वर्षांपासून जोपासत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, गणेशमूर्तींना यंदाही चांगली मागणी आहे. आम्ही ठरवलेल्या कालावधीतच गणेशमूर्तीची नोंदणी स्वीकारतो. त्यामध्ये शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना अधिक मागणी आहे.

शाडूच्या मातीच्या मूर्तींनाही मागणी आहे; परंतु ती बनवण्यास कालावधी जास्त लागत असून परिश्रमही खूप लागतात. तसेच शाडूची माती खूप महाग झाली आहे, तर ती बनविणारे कारागीर नसल्याने एकट्यालाच या मूर्ती बनवाव्या लागतात. अधिक कामाचा ताण पडतो; परंतु त्या बनविल्या जाव्यात, यावर लक्ष द्यावे लागत असल्याने अधिक मूर्ती बनविल्या जात नाहीत. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शाडूच्या 7 ते 8 मूर्ती नोंदणीनुसार बनवल्या गेल्या आहेत.

वाढत्या महागाईमुळे साहित्याचे भावही दुपटीने वाढले आहेत. तरीही मूर्ती बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. मागणीनुसार मूर्ती तयार होत असून रंगरंगोटीच्या कामांनाही वेग आला आहे. या आठवड्यात मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे, असे व्यापारी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

शाडूच्या मूर्तींना पसंती 
काही वर्षांत बदलत्या काळानुरूप आता मातीत गणेशमूर्ती घडवणारे कारागीरच मिळत नसल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली. गणेशमूर्तीची किंमतही कलावंताचे कौशल्य, त्याचे नाव, काम करण्याची पद्धत आणि भाविकांची श्रद्धा यावर अवलंबून असते. काही वर्षांत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना मागणी वाढत असतानाही कित्येक पटीने शाडूच्या मूर्तींनाही मागणी आहे. शाडूच्या गणेशमूर्तीला शास्त्रामध्ये मानाचा गणपती म्हणून स्थान दिले जाते. या मूर्ती पाण्यामध्ये सहजरीत्या विसर्जित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेकांकडून शाडूच्या मूर्तीला पसंती दिली जाते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com