विजू खोटेंना हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीची श्रद्धांजली

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

शोलेमध्ये कालिया साकारणारे आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे काल (ता. 30) निधन झाले. 78व्या वर्षी मुंबईतील गावदेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. काल सकाळी 11 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मुंबई : शोलेमध्ये कालिया साकारणारे आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे काल (ता. 30) निधन झाले. 78व्या वर्षी मुंबईतील गावदेवी येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. काल सकाळी 11 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराला अनेक कलाकारांची उपस्थिती होती. विजू खोटे यांची बहिण शोभा खोट त्यांची मुलगी भावना बलसावर याही यावेळी उपस्थित होत्या. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, संगीततकार भरत दाभोळकर, अभिनेता अर्षद वारसी तसेच मराठी कलाकारही उपस्थित होते. यावेळी बहिण शोभा खोटे यांना अश्रू अनावर झाले. 

'गल्ती से मिस्टेक हो गया' सर, विजू खोटेंचे डायलॉग आणि भूमिका

viju khote in andaz apna apna

विजू खोटे हे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत लोकप्रिय आणि लाडके कलाकार होते. मराठी आणि हिंदीत सुमारे 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी लक्षात राहण्यासारख्या छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या. 

विजू खोटे यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. संवादकौशल्य  आणि उंचपुरी शरीरयष्टी अशी ओळख असलेल्या विजू खोटे यांच्या अंदाज अपना अपना, कालिया, अशी ही बनवा बनवी हे प्रसिद्ध चित्रपट आहेत. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली होती. त्यातील सरदार मैने आपका नमक खाया है हा संवाद अजूनही कोणी विसरलेले नाही.

viju khote in sholay


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last rituals of veteran actor Viju Khote