लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी

जेष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना काल ( सोमवारी ) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग म्हणजेच ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं.  त्यांना व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास) ठेवण्यात आले होतं, अशी माहिती सूत्रांनी मिळाली. दरम्यान, आज लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल एक दिलासादायक बातमी समोर येतेय.

लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याचं आता समजतंय.  छातीत जंतूसंसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिदींनी आता औषधांना प्रतिसाद दिला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. सध्या लता दीदींची प्रकृती स्थिर आहे असं मंगेशकर कुटुंबियांकडून सांगण्यात येतंय.  याबाबत कोणतही मेडिकल बुलेटीन काढण्यात आलेलं नाही. 

लता मंगेशकर विविध भाषांमध्ये आपली गाणी गायली आहेत. तब्बल 36 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तीस हजाराहून जास्त गाणी लता दीदी यांनी गायली आहेत. लता दीदींना भारतातील सर्वोच्च पुरस्कार 'भारत रत्न' याने सन्मानित करण्यत आलं आहे. भारत रत्न यासोबतच दादासाहेब फाळके आणि इतर महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 

Webtitle : lata mangeshkar responds to the medical treatment family says lata didi is stable

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com