रिकामटेकड्यांनो, माझी प्रकृती उत्तमः लता मंगेशकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे.

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत, अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन आज (शुक्रवार) दिली आहे.

'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती उत्तम असून मी माझ्या घरी आहे' असं लता मंगेशकर यांनी ट्विटरवर लिहिले आहे. सोशल नेटवर्किंगवर लता मंगेशकर यांची प्रकृती अस्वस्थ असून, उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, असा मजकूर काही दिवसांपासून फिरत आहे. यामुळे अनेकजण लतादीदींची प्रकृतीविषयी चौकशी करत होते. मात्र, या सर्व अफवा असल्याचं लता मंगेशकरांनी स्पष्ट केलं आहे.

सोशल नेटवर्किंगवर यापूर्वीही अनेक मान्यवरांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. अखेर त्याबाबत खुलासा करावा लागत आहे. नेटिझन्स सत्य माहितीची पडताळणी न करताच मेसेज फॉरवर्ड करत असल्यामुळे अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

लता मंगेशकर यांनी 28 सप्टेंबरला नव्वदीत पदार्पण केले. लतादीदींना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. लतादीदी संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चाही गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. 'गाणं हा माझा श्वास आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार आहे. त्यामुळे निवृत्तीचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्न त्यांनी केला. रिकामटेकड्यांना माझे गाणे आणि निवृत्तीचा खोटा संदेश सोशल मीडियावर पसरवल्याचे त्यांनी म्हटलं होते.

Web Title: lata mangeshkar rubbishes rumors of being admitted to the hospital