लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दलची आताच्या घडीची मोठी बातमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 November 2019

लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येतेय. मंगेशकर यांच्या कुटुंबियांकडून याबद्दल माहिती शेअर करण्यात आली आहे. 

लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येतेय. मंगेशकर यांच्या कुटुंबियांकडून याबद्दल माहिती शेअर करण्यात आली आहे. 

Statement on Lata Didi's health

Dear Friends. We are as happy as you are to inform you that with all your prayers and best wishes, Lata didi is doing much better. Thank You for being there. God is great.

Warm regards
Team Lata Mangeshkar

लता दिली यांची प्रकृती आता बरी आहे. सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे लता दीदी आता बऱ्या आहेत. आमच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल सर्वाचे आभार.  

लता दीदी यांची तब्येत आता बरी आहे. डॉक्टरांच्या औषधांना लता दीदी आता प्रतिसाद देतायत. त्यामुळे लता दीदी यांच्या तब्येतीत दिवसेंदिवस सुधारणा होतेय. लता मंगेशकर याचं वय आता 90 वर्ष आहे. दीदींना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

काल सोशल मिडियावर अत्यंत चुकीचा आणि कोणतीही माहिती न घेता लता दीदी यांच्या निधनाच्या बातम्या फिरत होत्या. त्यामुळे सर्वानाच त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. अशातच ANI या वृत्तसंस्थेने लता दीदी यांची तब्येत आता आधीपेक्षा चांगली असल्याची दिलासादायक बातमी दिली होती. अशात आज टीम लता मंगेशकर यांच्याकडून आलेली दीदींच्या तब्येतीची बातमी दिलासादायक आहे. लता दीदी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होतेय. आता मंगेशकर कुटुंबीय लता दीदी घरी परतण्याची वाट पाहतायत.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता दीदींची रुग्णालयात भेट घेतली. आठवड्याभरापासून लता दीदी रुग्णालयात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूर केली. 

 

Webtitle : latest info about lata mangeshkars health


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest info about lata mangeshkars health