esakal | Farmers protest | किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईतून दिल्लीला रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers protest | किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईतून दिल्लीला रवाना

राज्यातील ऑल इंडिया युथ व स्टुडंट्‌स फेडरेशनने किसान पुत्र संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात केली आहे.

Farmers protest | किसान पुत्र संघर्ष यात्रा मुंबईतून दिल्लीला रवाना

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील ऑल इंडिया युथ व स्टुडंट्‌स फेडरेशनने किसान पुत्र संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात केली आहे. यात्रा आज मुंबईतून निघाली असून, दिल्लीच्या सिंधू सीमेवर धडकणार आहे. 

केंद्राचा कृषी कायदा भांडवलदारांच्या फायद्याचा आहे. हुकूमशाही मोदी सरकार ते आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिवाय आंदोलकांना देशद्रोही अशी उपमा देत बदनाम करीत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोबत ऑल इंडिया युथ व स्टुडंट्‌स फेडरेशन देशव्यापी आंदोलन करणार आहे. 70 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यात येणार आहे. यामध्ये 2 ते 5 फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे या जिल्ह्यांत किसान पुत्र संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली. आज ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशनचे संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईतून किसान पुत्र संघर्ष यात्रा दिल्लीला जाईल व वाटेत सभा घेण्यात येणार असल्याचे ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशचे राज्य अध्यक्ष विराज देवांग यांनी सांगितले.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

latest marathi news farmers protest Kisan Putra Sangharsh Yatra Departed to Delhi mumbai latest