आता फेसबुकवरून पाठवा पैसे.. कसे ? वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मुंबई : भारतात BHIM, Google Pay, PayTM असे एक ना अनेक ऑप्शन्स  सध्या पैसे देवाण घेवाणीसाठी वापरले जातात. यात आता सोशल मीडियाची मोठी कंपनी फेसबुक ही देखील पुढे सरसावली आहे. आता तुम्ही फेसबुक (Facebook) , WhatsApp , मेसेंजर (Messenger) किंवा अगदी तुमचं अत्यंत आवडतं इंस्टाग्राम (Instagram )  यावरूनही पैसे पाठवू शकता. कारण, आता फेसबुक ने आपलं 'फेसबुक पे' (Facebook Pay) या नावानी नवीन मनी ट्रान्स्फर सिस्टीम सुरु केली आहे. 

फेसबुक मार्केटप्लेस आणि कॉमर्स शाखेचे उपाध्यक्ष देबोरा लिउ  यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. नुकतच फेसबुक ने आपली क्रिप्टो करन्सी म्हणजेच आभासी चलन लिब्रा हे देखील बाजारात आणली आहे. मात्र, फेसबुक पे हे लिब्रा वॉलेटपेक्षा वेगळं असणार आहे. दरम्यान, ही सुविधा टप्याटप्याने जगभरातील लोकांना वापरता येणार आहे.   

अमेरिकेत याच आठवड्यात 'फेसबुक पे' या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.  'फेसबुक पे' ही सुविधा आणखी लोकांपर्यंत, जगभरातील आणखी स्थानांपर्यंत आणि इन्स्टाग्राम, व्हॉट्सअपवरही देखील येत्या काळात सुरु होणार आहे.

कसं वापराल फेसबुक पे ? 

  • मेसेंजर किंवा  फेसबुकवरून  सध्या ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे
  • फोन नंबर आणि अकाऊंट नंबर तुम्हाला लिंक करण्याच्या काही स्टेप्स सुरवातीला कराव्या लागू शकतात
  • KYC ची पूर्तता देखील करावी लागू शकते. 
  • यानंतर तुम्ही फेसबुक किंवा मेसेंजरवरून 'फेसबुक पे'चा वापर सुरू करू शकता.
  • अगदी सोप्या आणि सहज पद्ध्तीते तुम्ही फेसबुक वरून पैसे पाठवू शकतात आणि स्वीकारू शकतात असं फेसबुक कडून सांगण्यात येतंय.  

कुठलही डिजिटल माध्यम वापरताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याची सुरक्षितता असते. दरम्यान 'फेसबुक पे' हे अत्यंत सुरक्षित असल्याचं कंपनी कडून नमूद करण्यात आलंय. यामध्ये युजर पीन मनी ट्रान्स्फर पिन तसंच फेस आयडी किंवा टच आयडीच्या माध्यमातून सुरक्षा पाहायला मिळू शकते. 

भारतात सध्या ही सुविधा सुरु झालेली नाही. मात्र येत्या काळात तुम्हाला फेसबुकवरून एकमेकांना पैसे पाठवता येणार आहेत.   

Webtitle : latest payment system now send and receive money from facebook pay 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest payment system now send and receive money from facebook pay