#MumbaiRains : नेटीझन्स म्हणतायत 'मुख्यमंत्री' पाहिल्याशिवाय पाऊस जायचा नाही..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

यंदा परतीचा पाऊस चांगलाच रेंगाळलाय. आजही दक्षिण आणि मध्य मुंबईत दुपार पासून पावसाची रिपरीप सुरु आहे. मुंबईत संध्याकाळी पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराच अवघ्या 15 मिनीटात शहरातील काही ठिकाणी 5 मि.मी हून अधिक पावसाची नोंद झाली.

नोकरदारांना परतीच्या प्रवासात पावसाने गाठल्याने चांगलीच पळापळ झाली होती. देशातून यंदा पहिल्यांदाच 9 ऑक्‍टोबर पासून परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदी नुसार पहिल्यांदाच एवढ्या विलंबाने परतीच्या पावसाला सुरवात झाली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून मुंबईत परतीच्या पावसाने उघडिप दिली होती. मात्र, aaj (शुक्रवार) संध्याकाळ पासून पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. रात्रभर पाऊस होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील दोन पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी 6.30 वाजे पर्यंत 10 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. 

दरम्यान, जसा पाऊस थांबत नाही तसे मुंबईकर देखील पावसावर व्यक्त व्हायला अजिबात मागे नाहीयेत.  ट्विटरवर  व्यक्त होणाऱ्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया.  
 
Webtitle :latest updates of mumbai tain city and suburbs

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest updates of mumbai tain city and suburbs