लॉंड्रीचालकास 7 वर्षांची कैद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई - अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी "पॉक्‍सो' (लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याखाली दोषी लॉंड्रीचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने सात वर्षे कैद आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. महापालिकेच्या डी. एन. नगर येथील मराठी शाळेत मुंबई पोलिसांनी पोलिस दीदी उपक्रम राबवला होता. वस्तीतील एक लॉंड्रीचालक छळ करत असल्याचे पाच मुलींनी पोलिस दीदीला सांगितले होते. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास करून राजेशकुमार ऊर्फ के. के. भय्या ऊर्फ संतोष रामखिलावन कनोजिया याच्यावर "पॉक्‍सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कनोजियाला सत्र न्यायालयाने सात वर्षे तुरुंगवास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
Web Title: Laundry Owner 7 years punishment crime