विधी अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. 2 जूनपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, 10 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट महाविद्यालयात सादर करावी लागणार आहे. 

विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षा अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंट महाविद्यालयांमध्ये जमा करावी, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 2 ते 10 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरून तो महाविद्यालयात जमा करावे लागणार आहेत, तर विलंब शुल्कासह 11 ते 14 जूनपर्यंत अर्ज भरून त्याची प्रिंट महाविद्यालयात जमा करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने इनवर्ड न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज पारंपरिक पद्धतीने भरावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Web Title: Law application today mumbai university