स्वयंपाकघरात रमणारे हात प्रचारात आघाडीवर

प्रचारात प्रशांत ठाकूर यांच्या पत्‍नी वर्षा ठाकूर यांचा सहभाग.
प्रचारात प्रशांत ठाकूर यांच्या पत्‍नी वर्षा ठाकूर यांचा सहभाग.

पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र सध्या पनवेल परिसरात पाहायला मिळत आहे. घरातील काम सांभाळून वेळ भेटेल तसा आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी झटणारी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी कामाला लागल्याचे दोन्ही पक्षांच्या मिरवणुकांमध्ये असलेल्या महिलांच्या लक्षणीय संख्येमुळे अधोरेखित होत आहे. स्वयंपाकघरात रमणारे हात सध्या भित्तीपत्रकापासून माहितीपत्रक वाटण्यात गुंतले आहेत. 

पहाटे उठून संसार, मुलांच्या परीक्षा, घरकाम या सर्वांचे नियोजन करत दिवसभर प्रचारासाठी लगबग करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांची सध्या घाई उडाली आहे. महिला कार्यकर्त्या मतदारांच्या घरात चुलीपर्यंत जाऊन मनपरिवर्तन करू शकतात. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांचा प्रचार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 

कोणतीही निवडणूक म्हटली की, प्रचार करण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे महत्त्व प्राप्त होते. घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या या कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते. महिलांच्या माध्यमातून उमेदवारांना मतदारांच्या थेट चुलीपर्यंत जाऊन प्रचार करण्याची संधी प्राप्त होत असते. त्या अनुषंगाने महिला कार्यकर्त्या जमवण्याची मोठी जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांना सांभाळावी लागत आहे. प्रचार मोहीम राबविण्याचे कसब असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांसोबतच भाजप मित्रपक्ष युती, तसेच शेकाप आघाडीच्या महिला नगरसेविकाही  आपापल्या समर्थक महिला कार्यकर्त्यांसोबत प्रचारात हिरहिरीने भाग घेत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com