किमान दोन दिवस थंडी मारणार दडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - थंडी गायब झाल्याने मुंबईत पुन्हा उकाडा जाणवत आहे. तीन दिवस 35 अंश सेल्सिअसवर असलेला पारा खाली उतरण्याची लक्षणे नाहीत. वातावरणातील ही स्थिती आणखी किमान दोन दिवस राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 48 तास मुंबईतील ढगाळ वातावरण कायम राहील.

वर्दाह वादळाचा प्रभाव कोकण वगळता राज्यभरातून आता काढता पाय घेत आहे. विदर्भ वगळता कोकण व मध्य महाराष्ट्रातील आकाश वादळाने सोबत आणलेल्या बाष्पाने व्यापून टाकले होते. परिणामी, नाशिक व नगर येथे सातत्याने कमी राहणाऱ्या किमान तापमानातही वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात नगरमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 10 अंशाखाली तापमान सरकले होते. सोमवारनंतर दोन्ही ठिकाणी तापमानात वाढ झाली. गुरुवारी नाशिकमधील तापमान 15.4 अंश सेल्सिअसवर गेले. ही स्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. कोकणात मात्र आकाश कोरडे होण्यास थोडा अवधी असल्याची माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवस तापमान किमान 23 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.

Web Title: At least two days to kill to hide the cold