'सोसायटी फॉर फास्ट जस्टीस'च्या वर्धापनदिनी व्याख्यान

अच्युत पाटील 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बोर्डी - सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायिक हक्कासाठी कार्य करणाऱ्या सोसायटी फॉर फास्ट जस्टीस डहाणू शाखेचा पाचवा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्ताने डहाणू येथील वणिक समाज दशाश्रीमाळी सभागृहात रविवार दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 9-30 वाजता न्यायव्यवस्थे विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिन्य प्रशांत भूषण, न्यायतंत्राचे उत्तरदायीत्व, आणि निवृत्त पोलिस उच्च अधिकारी डॉ, के.एस.सुब्रम्हण्यम यांचे न्यायतंत्रामध्ये सुधारणा या विषयावर व्याख्यान होणार आहे. परिसरातील वकील, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोसायटी फाँर फास्ट जस्टीस डहाणू शाखेचे अध्यक्ष संतोष शेट्टी व सचिव नरेंद्र पटेल यांनी केले आहे.

Web Title: Lectures on the anniversary of 'Society for Fast Justice'