विधानपरिषद निवडणुक : परिषदेसाठी लढत अटळ; सदाभाऊ खोत यांची माघार

काँग्रेसचे दोन उमेदवार मैदानात
Legislative Council elections congress two candidate sadabhau khate shivajirav garje Withdrew mumbai
Legislative Council elections congress two candidate sadabhau khate shivajirav garje Withdrew mumbaisakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणुकीचाही आखाडा रंगणार असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने विनवण्या करूनही काँग्रेसने दोन्ही उमेदवार कायम ठेवले आहेत. सदाभाऊ खोत यांच्या रूपाने सहाव्या उमेदवाराने माघार घेतली असली तरी काँग्रेस मात्र ठाम आहे. आज दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात राहिले असून असून भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. डमी म्हणून अर्ज भरणाऱ्या शिवाजीराव गर्जे यांनी आज माघार घेतली. येत्या २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

याआधी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने ही जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. आता विधानपरिषदेसाठीचे पक्षीय बलाबल पाहता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार दिले आहेत. भाजपनेही तशीच रणनीती ठेवून, सहाव्या जागेवरून खोत यांचा अर्ज मागे घेतला. एकच उमेदवार निवडून आणण्याइतपत बळ असल्याने काँग्रेसनेही दोनपैकी एक उमेदवार माघारी घेणे अपेक्षित होते. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली पण ती निष्फळ ठरली.

आता चार जागी उमेदवार निवडून येणार असूनही भाजपने पाच उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंतची डेडलाईन होती. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड यांचे अर्ज कायम आहेत. शिवसेनेकडून सचिन आहिर, आमश पाडवी हे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप हे रिंगणात असतील. लाड आणि जगताप यांच्यात संघर्ष अटळ मानला जातो. या जागेसाठी काँग्रेसकडे पुरेशी मते नाहीत तसेच भाजपच्या उमेदवारालाही विजयासाठी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसने माघार घेतली नसल्यानेच विधानपरिषदेसाठी ही लढत होईल. भाजपनेही त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पाचवी जागा जिंकूच; विरोधीपक्ष नेते फडणवीस यांचा निर्धार

‘‘विधानपरिषदेच्या निवडणुकीचा प्लॅन तयार असून महाविकास आघाडीतील घटकपक्ष, आमदारांतील अस्वस्थतेचा फायदा घेऊन या निवडणुकीतील पाचवी जागा जिंकणार आहोत.’’ असे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. या जागेवरच उमेदवार निवडून आणणे सोपे नसले, तरी आराखडा भक्कम असल्याचे सांगून फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्यानेच ही निवडणूक होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘ ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचा प्रयत्न होता, तसे झाले नाही. निवडणूक लढताना सरकारमधील नाराज आमदारांची मोठी मदत होईल. काँग्रेसने ऐकले असते तर निवडणूक झाली नसती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘ईडी’ ने चौकशी केली म्हणून त्यांचे नेते आंदोलन करत लोकांना वेठीस धरत आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर ही कारवाई होत आहे त्यांनी २ हजार कोटी रुपयांची मालमत्ता हडपल्याचा आरोप होतो आहे. न्यायालयानेच लोकांना एक आणि राहुल गांधी यांना एक असा न्याय होऊ शकत नाही असे म्हटले आहे.’’

  • भाजप १०६

  • राष्ट्रवादी काँग्रेस ५३

  • काँग्रेस ५५

  • शिव सेना ४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com