लिंबाच्या दरात मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

उन्हाळ्यात शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या लिंबांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात आता चांगल्या दर्जाचे लिंबू येत असून, घाऊक बाजारात १०० ते १२५ क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे लिंबांचे दरही शेकडा १५० ते २०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पावसाळा संपेपर्यंत दर स्थिर राहतील, अशी माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

वाशी -  उन्हाळ्यात शेकडा ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या लिंबांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात आता चांगल्या दर्जाचे लिंबू येत असून, घाऊक बाजारात १०० ते १२५ क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे लिंबांचे दरही शेकडा १५० ते २०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पावसाळा संपेपर्यंत दर स्थिर राहतील, अशी माहिती घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

उन्हाळ्यात लिंबांचे उत्पादन फारच कमी होत असल्यामुळे आवकही कमी होते आणि दर वाढतात. या वर्षी उन्हाळ्यात दर ४०० ते ५०० रुपये शेकड्यापर्यंत वाढल्याने, एका लिंबूसाठी चार ते पाच रुपये द्यावे लागत होते. त्यामुळे किरकोळ बाजारातही लिंबू महागले होते आणि पाच रुपयांच्या खाली लिंबू मिळत नव्हता. मात्र आता किरकोळ बाजारातही १० रुपयांना सहा किंवा सात लिंबू सहज मिळत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. लिंबू उत्तम पाचक असल्याने लिंबाचा जेवणात आवर्जून वापर केला जातो. केवळ लिंबू सरबतासाठीच नव्हे, तर वर्षभर लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lemon price down in washi market

टॅग्स