बिबट्याच्या अवयवांची चौक परिसरातच विक्री?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

खालापूर - बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणात खालापूर तालुक्‍यातील चौक गावातील तरुणांचा सहभाग असल्याचा प्रकार कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आल्यानंतर बिबट्यांची नखे व इतर अवयव चौक परिसरातच विक्री झाल्याची चर्चा आहे.

त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. कल्याण गुन्हे शाखेने चौक गावातील विशाल लक्ष्मण धनराज, सचिन जनार्दन म्हात्रे, प्रमोद हातमोडे व चौकनजीक आसरे गावातील पोपेटा यांना बिबट्याची कातडी विकल्याच्या प्रकरणात तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. चौकशीत विशाल व सचिनचा सहभाग उघडकीस आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांना सुगावा लागू न देता सुरू होता.

Web Title: leopard body part sailing