बिबट्याच्या होरपळलेल्या बछड्याला जीवदान

Leopard
Leopard

मुंबई - नगर जिल्ह्यातील उसाच्या फडात लागलेल्या आगीत होरपळलेल्या बिबट्याच्या बछड्याला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने जीवदान दिले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर या बछड्याच्या जखमा भरून आल्या असून, उद्यानातील अधिकाऱ्यांनी त्याचे "सूर्या' या नावाने बारसेही केले.

बिबट्याचा हा बछडा राष्ट्रीय उद्यानातील लेपर्ड रेस्क्‍यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचार घेत आहे. नगरमधून आणण्यात आले, तेव्हा प्रकृती खालावलेल्या या बछड्याचे वजन केवळ दोन किलो होते.

नगरमधील उसाच्या फडाला डिसेंबरमध्ये आग लागल्यामुळे तीन बछडे होरपळले होते. उपचारांदरम्यान आठवडाभरात एक मादी व एक नर अशा दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. वाचलेल्या बछड्याची आई पुन्हा उसाच्या शेताकडे फिरकली नाही. त्यामुळे या पावणेदोन महिन्यांच्या नर बछड्याला 12 डिसेंबर 2018 रोजी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.

नगरहून 2017 पासून बिबट्याचे चार बछडे नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com