बिबट्यांची पुन्हा मोजणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

जून किंवा जुलैमध्ये नेमकी संख्या समजणार
मुंबई - बिबट्याच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांची मोजणी वन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यात बिबट्यांची संख्या समजणार आहे.

राष्ट्रीय उद्यानातील बिबटे आणि त्यांचा उद्यान परिसराजवळचा वावर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मानवी वसाहतीतील कुत्रे खाण्यासाठी बिबटे येत असल्याचे याआधीच्या सर्वेक्षणात सिद्ध झाले. जून 2015 मध्ये या जंगलातील बबट्यांची संख्या आणि जंगल परिसरातील बिबट्यांचे खाद्य असलेले इतर प्राणी यासंदर्भातील इकॉलॉजी ऑफ लेपर्डस इन संजय गांधी नॅशनल पार्क हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी उद्यानातील 35 बिबट्यांची ओळख ट्रेप कॅमेऱ्यांद्वारे समोर आली. त्यानंतर बिबट्यांचे सर्वेक्षण एक वर्षानंतर करण्याचे ठरले. त्यानुसार गेल्या महिन्यापासून दुसऱ्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे.

Web Title: leopard counting