नॅशनल पार्कमधील बिबट्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वयोवृद्ध  विल्यम या नर बिबट्याचा वार्धक्‍याने सोमवारी मृत्यू झाला. वयोमान आणि हृदयाला जोडणाऱ्या श्वसननलिकेत त्रास झाल्याने विल्यमचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. 

विल्यमला 7 जुलै 2017 रोजी औरंगाबादहून बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले होते. एका पायाने अधू असलेल्या विल्यम अंदाजे पाच वर्षांचा असावा, असा अंदाज तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बांधला आहे.  अपंगत्वामुळे त्याला कायमचाच बोरिवलीतील पिंजऱ्याचा आश्रय मिळाला. 

बिबट्याचे सतरा वर्ष वय हे वार्धक्‍याचे समजले जाते. त्यानुसार विल्सन वार्धक्‍याकडे झुकला होता. शनिवारी अचानक त्याने खाणे सोडले. त्यामुळे त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून होतो. रविवारी त्याने खाणे पुन्हा सुरु केले. त्यानंतर सोमवारी दीड वाजता त्याने प्राण सोडला. विल्यमचे नंतर परळ येथील पशुवैदयकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. विल्यमच्या अपंगत्वामुळे त्याची टॅक्‍सीडर्मी करता येणार नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश पेठे यांनी दिली. त्याच्या जाण्यानंतर पिंजऱ्यातला मित्र जोन  आता एकटाच राहत आहे. विल्सननंतर उदयानातील लेपर्ड रेस्क्‍यू एण्ड रिहेबिलिटेशन सेंटरमध्ये अकरा बिबटे आहेत.

Web Title: Leopard died in national park mumbai