एसआरपीएफच्या व्यायामशाळेत बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मुंबई - गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीतील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) व्यायामशाळेत रविवारी बिबट्या घुसला होता. वन विभागाच्या पथकाने बिबट्याला बेशुद्ध करून पकडले. दोन तास हा थरार सुरू होता. या बिबट्याला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

एसआरपीएफ युनिट 8 च्या व्यायामशाळेत सकाळी 8.30 ला बिबट्या घुसल्याचे काहींनी पाहिले. त्यांनी त्वरित वन विभागाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळवले. तसेच व्यायामशाळेचे दरवाजे बंद करण्यात आले. तासाभरानंतर वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराला एसआरपीएफच्या जवानांनी घेराव घातला होता. एका तासानंतर बिबट्याला इंजेक्‍शनद्वारे बेशुद्ध करण्यात वन विभागाला यश आले.

Web Title: Leopard in FRPF Gym