गोरेगावातील गृहसंकुलात बिबट्यांचा वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील गोरेगाव येथील एका गृहसंकुलामध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे सीसी टीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात वनविभागाचे बचावकार्य पथक गस्त घालणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी सांगितले. दरम्यान, नागरी वसाहतीमध्ये बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गोरेगाव पूर्वेकडील गिरुकुंज वसाहतीच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास कुत्रा खाण्यासाठी आलेला बिबट्या दिसला. त्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घातली. त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या गाड्यांच्यामधील जागेत त्याला नेले. तिथे असलेल्या अन्य कुत्र्यांना पकडायला तो बिबट्या पुन्हा गेला. त्याच्यापाठोपाठ आणखी एक बिबट्या कुत्र्यांच्या मागे जाताना सीसी टीव्हीमध्ये दिसला. घडल्या प्रकाराची माहिती नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना दिली. सीसी टीव्हीमधील चित्रीकरण पाहिले असता, हे दोन्ही बिबट्यांची पिल्ले असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याला कुत्रे पकडणे सोपे जात असल्याने त्यांना पकडण्यासाठी ते नागरी वस्तीत येत असतात, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बिबट्याचा वावर असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन, या परिसरातील नागरिकांनी आवश्‍यक ती सावधगिरी बाळण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत.

Web Title: leopard in goregav home complex