मायक्रोचिप बसवलेला बिबट्या जंगलात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - पवईतील हिरानंदानी परिसरात घबराट पसरवणारा बिबट्या वन विभागाच्या वैद्यकीय अहवालानुसार तंदुरुस्त असल्याचे आढळून आले. शनिवारी (ता. १२) मध्यरात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याची रवानगी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात झाली होती. आता त्याला जंगलात सोडण्यात आले आहे. 

शनिवारी (ता. १२) बेशुद्धावस्थेत त्याला उद्यानात आणण्यात आले होते. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर मंगळवारी वैद्यकीय अहवाल आला. सहा वर्षांचा हा बिबट्या वैद्यकीय अहवालानुसार तंदुरुस्त असून त्याबाबतचे पत्र आम्ही लवकरच ठाणे प्रादेशिक वन विभागाला देऊ, असे उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. हा बिबट्या काही वर्षांपासून हिरानंदानी परिसरातील सुप्रीमो बिझनेस पार्कसमोरील डोंगरात वावरत होता. काही दिवसांपासून तो सतत दिसू लागल्याने घबराट पसरली होती. दोन महिन्यांपासून त्याला पकडण्याचे नियोजन सुरू होते, असे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बिबट्या नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतरही त्याच्या हालचालींवर वन विभागाचे लक्ष राहील. वन विभागाने त्याच्या शरीरात मायक्रोचिप बसवली आहे, असे ठाणे प्रादेशिक वन विभागाच्या मुंबई विभागाचे वनपरिक्षेत्रपाल संतोष कंक यांनी सांगितले.

Web Title: Leopard microchip fit in the forest ...