ठाण्यात बिबट्याचे कातडे जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

ठाणे - बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना रविवारी (ता. 15) ठाण्यातील राबोडी येथून पोलिसांनी अटक केली आहे. या कातड्याची 10 लाखांसाठी विक्री करणार असल्याची माहिती चौकशीत उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. किस्मतलाल बरखा मराबी (वय 30), कोरचा बरट मराबी (25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. ठाण्यात बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप बागूल यांना मिळाली होती. त्यानुसार बागूल यांच्या पथकाने सापळा रचून राबोडीतील साकेत रोडवर किस्मतलाल आणि कोरचा यांना अटक केली.
Web Title: leopard skin seized