पाळीव श्‍वानांसाठी लेप्टो लस बंधनकारक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - लेप्टोला रोखण्यासाठी पाळीव श्‍वानांना परवाना देताना लेप्टो प्रतिबंधक लस पालिकेने बंधनकारक केली आहे. भटक्‍या श्‍वानांनाही ही लस देण्याचा प्रस्ताव आहे. 

पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागातर्फे पाळीव श्‍वानांसाठी परवाने देण्यात येणार आहेत. पूर्वी श्‍वानांना रेबिजची लस देणे बंधनकारक होते. आता या लसीबरोबरच लेप्टोची लसही बंधनकारक करण्यात आल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले. 

पश्‍चिम उपनगरात 2015 मध्ये लेप्टोने हाहाकार माजवला होता. तेव्हा पालिकेने लेप्टोच्या कारणांची तपासणी केली असता, या परिसरातील श्‍वान आणि तबेल्यातील गाई-म्हशींच्या मलमुत्रातून हा आजार पसरल्याचे आढळले होते. त्यानंतर गेल्या वर्षीपासून तबेल्यांमधील प्राण्यांना लेप्टोची लस देणे बंधनकारक करण्यात आले. यावर्षीपासून पाळीव श्‍वानांना ही लस देणे बंधनकारक करण्यात आले. 

पाळीव श्‍वानांची होणार तपासणी 
देशभरात लवकरच पशुगणना सुरू होणार आहे. मुंबईतही अशा प्रकारची गणना होणार असून, त्यात पाळीव श्‍वानांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. मुंबईत 2012 मध्ये 40 हजार 598 पाळीव श्‍वान होते. यंदा ही संख्या वाढण्याची शक्‍यता पालिकेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. 

श्‍वानांच्या परवानांचा खर्च 
- श्‍वानांच्या वयानुसार शुल्क आकारले जाते. प्रत्येक वर्षासाठी 100 म्हणजे सात वर्षांचा श्‍वान असल्यास 700 रुपये शुल्क भरावे लागते. 
- पहिल्या वेळेस 150 रुपये शुल्क 
- रेबिज लस - 150 रुपये 
- लेप्टोसह इतर नऊ लस एकत्र - 750 ते 800 रुपये 

Web Title: Lepotos B vaccine for pet dogs