कुष्ठरोग शोधमोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नवी मुंबई - कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नवी मुंबई शहरात सोमवार (ता. २४) पासून कुष्ठरोग शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे. 

२४ सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबर या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी महापालिकेतर्फे ११० विविध समूहांची मदत घेतली जाणार आहे. 

कुष्ठरुणांना शोधून त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करणे, नवीन रुग्णांना शोधून त्यापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ नये म्हणून त्यावर उपचार करणे, कुष्ठरोग्यांचे जंतुसंसर्गावर नियंत्रण आणणे, अशा विविध प्रकारची कामे या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहेत. नवी मुंबई शहरात विशेषत्वाने महापालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून दुर्गम भाग, झोपडपट्टी विभागासहीत गावठाणांतील वसाहतींमध्ये ही शोधमोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे कुष्ठरुग्णांची माहिती विचारणा करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

३७ हजार ९९५ घरे तपासणार
कुष्ठरोग शोधमोहिमेसाठी नवी मुंबई शहरातील विविध परिसरातील ३७ हजार ९९५ घरांची निवड करण्यात आली आहे. ११० समूहांच्या मदतीने या घरांमध्ये जाऊन कुष्ठरोगी शोधण्यात येणार आहेत. रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेतले जाणार आहेत. कुष्ठरोगी आढळल्यास त्याच्यावर महापालिकेच्या रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रामार्फत मोफत औषधोपचार उपलब्ध केले जाणार आहेत. नवी मुंबई शहरात वर्षभरात ४१ कुष्ठरोगी आढळले आहेत.

Web Title: Leprosy start operation in navi mumbai