esakal | प्रथम संस्थेकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

प्रथम संस्थेकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील ५० गावांमध्ये कोरोनाच्या कालावधीपासून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक गावातून युवक युवती, माता-पालक यांची निवड करून स्वयंसेवक नेमण्यात आले.

हेही वाचा: देशाचे संरक्षण करणारे श्वान निवृत्तीनंतर तसेच सोडले जातात हे दु:खदायक

त्यांना भाषा आणि गणित विषयांचे तसेच रेडीनेस कॅम्प याविषयी प्रशिक्षण प्रत्यक्ष व झूम कॉलद्वारे देण्यात आले. भाषा विषयात चित्रावरून गोष्ट तयार करणे, चौदाखडी वाचन, विविध विषयांवर लेखन करता येणे तसेच मुलांना मनोरंजन पद्धतीने खेळ घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रथमचे प्रशांत गवळे, लक्ष्मण हाडळ तसेच इतर सहकारी यांच्या मार्गदर्शनाने सर्व गावांत स्वयंसेवक वर्ग घेत आहेत.

loading image
go to top