विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांचे धडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

वसई ः वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याशिवाय वाहतूक कोंडी होत असून याचा फटका नागरिकांना बसत आहे, याची दखल घेत नायगाव चंद्रपाडा येथील शांती गोविंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून जनजागृती केली.

वसई ः वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. याशिवाय वाहतूक कोंडी होत असून याचा फटका नागरिकांना बसत आहे, याची दखल घेत नायगाव चंद्रपाडा येथील शांती गोविंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून जनजागृती केली.

या वेळी त्यांनी वाहतूक नियमांसह सुरक्षित प्रवासाचे धडे दिले. तसेच ‘नियम पाळा, अपघात टाळा’, ‘आपलं कुटुंब वाट पाहत आहे’, ‘अति घाई, संकटात नेई’ आदी अनेक संदेश देऊन नागरिकांना भावनिक आवाहन केले. 

वसई पूर्वेकडे जूचंद्र रेल्वेफाटक आहे. या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे अपघातदेखील होतात. जूचंद्र परिसरातून वसई-दिवा असा लोहमार्ग असून यामुळे या ठिकाणी फाटक बसवण्यात आले आहे.

मालवाहतूक गाड्या आल्यानंतर हे फाटक बंद होते; मात्र जेव्हा फाटक उघडते अशा वेळेस ही वाहने एका रांगेत न चालवता काही जण लवकर निघण्याच्या उद्देशाने बेशिस्त पद्धतीने चालवत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा मनस्ताप होत आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांनी वाहनचालकांना करून दिली. 

वाहतूक पोलिसांकडून मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रेल्वे फाटक परिसरात वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी विविध संदेशही दिले. या वेळी शांती गोविंद विद्यालयाचे विद्यार्थी व रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी, रिक्षाचालक व ग्रामस्थांनी रेल्वे फाटकाजवळ उभे राहून जनजागृती केली. फेरी वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमाची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lessons from the rules of transportation for students in Vasai