5 हजार कॉलेज विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे धडे

दिनेश गोगी
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

उल्हासनगर : महिला-तरुणी-विद्यार्थिनींवर ओढवत असलेल्या विविध प्रसंगावर मात करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ठाणे तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात येत आहेत. या उपक्रमात तब्बल 5 हजार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून 16 तारखेला बिर्ला कॉलेजमध्ये या विद्यार्थिनींचा मेगा डेमोंस्ट्रेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वुमन डेव्हलपमेंट सेलच्या प्रमुख प्रा. भावना छाबरिया, अभाविपच्या कल्याण जिल्हा विद्यार्थीनी प्रमुख अॅड. राखी बारोड यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगरातील एसईएस नेताजी जूनियर कॉलेज आणि स्वामी हंसमुनी महाराज डिग्री कॉलेज, एसईएस गर्ल्स ज्युनियर कॉलेज, एस.डी.ओछानी कॉलेज मधे विद्यार्थिनींना मिशन साहसी या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थिनीची कुणी छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास किंबहूना हल्ला झाल्यास, त्यापासून पेन, रूमाल, आयडीकार्ड आदी स्वतः जवळील साहित्य वापरून स्वतःचा बचाव, रक्षण कसे करावे याचे सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आले.

कॉलेजच्या प्राचार्य रेखा ठाकुर, डॉ. किरण चिमनानी, गोदावरी गुरबानी, बसंती बसंतानी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. वुमन डेव्हलपमेंट सेलच्या प्रमुख प्रा. भावना छाबरिया, अभाविप कल्याण जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख अॅड. राखी बारोड, कल्याण जिल्हा संयोजक अमोल सोळंके, सुशांत शेलार उल्हासनगर विद्यार्थी प्रमुख नीरज यादव, कार्यकर्ते, आरती, राजा यादव उपस्थित होते.

Web Title: Lessons of Self-Defense to 5000 College Girls