समुद्राचे पाणी गोडे करताना पर्यावरणाला धक्का, भाजपचं आयुक्तांना पत्र

समीर सुर्वे
Thursday, 3 December 2020

मनोरी येथील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला दिली आहे. भाजपचे आमदार ऍड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई: मनोरी येथील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला दिली आहे. मात्र,आता हा प्रकल्प 200 दशलक्ष लिटर वरुन 440 दशलक्ष लिटरपर्यंत वाढविण्याचा विचार महानगर पालिका करत आहे. त्यामुळे खर्चही 3500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. प्रक्रिया करुन उरलेले रसायन युक्त पाणी पर्यावरणासाठी हानिकारक असून त्याबाबत पालिकेने काही अभ्यास केला आहे, असा प्रश्‍न भाजपचे आमदार ऍड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. याबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्‍नाची विचारणा ऍड.शेलार यांनी पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हा महागडा असून त्याऐवजी गळती आणि चोरीव्दारे वाया जाणारे पाणी, पावसाच्या पाण्याचा वापर असे पर्याय ऍड.शेलार यांनी सुचवले आहेत. महापालिका रोज 200 दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याऐवजी 440 दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हा खर्च 1600 कोटी रुपयांवरुन 3500 कोटी रुपयांवर पोहचण्याची शक्‍यता आहे.  सध्या प्रस्तावित असलेला गारगाई प्रकल्प महापालिका रद्द करणार का असा प्रश्‍न ऍड.शेलार यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा-  वकीलांना पुन्हा एकदा दिलासा, तिसर्‍यांदा लोकल प्रवासासाठी मुदतवाढ

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार समुद्राचे पाणी गोडे करताना जे रासायनिक पाणी उरते त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. 440 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळवताना 670 दशलक्ष लिटर रसायनयुक्त पाणी तयार होणार आहे. त्याची व्हिलेवाट कशी लावणार?या पाण्याचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होऊन मासेमारीला धोका निर्माण होणार का असेही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Letter from BJP MLA Ashish Shelar Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter from BJP MLA Ashish Shelar Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal