
सकल हिंदू समाजाचा मोर्चा विरोधात 27 मानवाधिकार संघटनांकडून मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र
मुंबई : 27 मानवाधिकार संघटनांनी शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
मानावाधिकार संघटनांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना लिहिलेल्या पत्रात सकल हिंदू समाजाच्या वतीने 5 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची विनंती केली आहे .सर्वोच्च न्यायालयाने 3 फेब्रुवारी रोजी जारी केलेले निर्देशाप्रमाणे सकल हिंदू समाजाच्या मोर्चा विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
29 जानेवारी रोजी मुंबईत सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या कार्यक्रमांमध्ये जातीय द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराला आवाहन करणारी भाषणे वक्त्यांनी केली असल्याचं पत्रात नमूद आहे. मागील घटनाच्या पार्श्भूमीवर 5 फेब्रुवारी रोजी मोर्चाचे परत नियोजन करण्यात आले.
त्यामुळे सांप्रदायिक द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या वक्त्यांवर त्वरित फौजदारी कारवाई करावी, असेही ते आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे.अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक भाषणाला आळा घालणे आणि भारतीय संविधानात निहित धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करण्याचे आव्हान पत्राद्वारे 27 मानवाधिकार संघटनांनी केले आहे.