रझा अकादमीचं राज्यपालांना पत्र, नमाजासाठी राजभवनाची मशीद उघडा

पूजा विचारे | Sunday, 22 November 2020

सध्या राज्यातील धार्मिकस्थळं उघडी झाल्यानंतर रझा अकादमीनं राजभवनातील मशीद देखील नमाजासाठी उघडण्याची मागणी केली आहे. रजा अकादमीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्रं लिहून ही विनंती केली आहे.

मुंबईः सतत होणाऱ्या मागणीनंतर राज्यातील मंदिरं, धार्मिळस्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिवाळीमध्ये राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्यात आली. सध्या राज्यातील धार्मिकस्थळं उघडी झाल्यानंतर रझा अकादमीनं राजभवनातील मशीद देखील नमाजासाठी उघडण्याची मागणी केली आहे. रजा अकादमीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्रं लिहून ही विनंती केली आहे. रझा अकादमीनं पाठवलेल्या पत्रामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबद्दल वृत्त दिलं आहे. मात्र, राजभवनातून याबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. तर  राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तात म्हटलं आहे.  . मात्र, मुस्लिम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आली होती. त्यामुळे बाहेरून येणारे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करायचे. या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. शुक्रवारी बाहेरील लोक येथे नमाजासाठी यायचे. मात्र कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

अधिक वाचा-  मुंबईत सरसकट लोकल प्रवास लांबणीवर? सध्याच्या प्रवासातही कपातीचे संकेत

रझा अकादमीचे महासचिव एम. सईद नुरी यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिलं आहे.  23 मार्चपासून राज्यातील सर्वच धार्मिकस्थळं बंद होती. 16 नोव्हेंबर रोजी पुन्हा धार्मिकस्थळं सुरू करण्यात आली. त्यामुळे रजा अकादमीचे महासचिव सईद नुरी यांनी राज्यपालांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाज पठणासाठी सुरु करण्याची विनंती केली आहे.  सर्वच धार्मिकस्थळांच्या समित्या आणि संस्थानांनी कोरोना नियमाचं काटेकोर पालन करण्यावर भर दिला आहे. राजभवनातील कर्मचारी राजभवनातील मशिदीत सामान्य लोकांना नमाज पठणासाठी येऊ देत नाही. आता धार्मिकस्थळं उघडी करण्यात आल्याने या सर्वसामान्य जनतेला नमाज पठणाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

अधिक वाचा-  कोरोनामुक्त रुग्णांमध्ये आरोग्य समस्या? आरोग्याची काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

तसंच देशात सगळीकडे धार्मिक स्थळ खुली करण्यात आली आहे. राजभवनातील कर्मचाऱ्यांना मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ पाच ते सात लोकांना नमाजसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आमची विनंती आहे की तात्काळ आदेश काढून कर्मचाऱ्यांना कोरोनापूर्वीप्रमाणेच नमाज पठण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असं राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Letter from Raza Academy Governor Open the Raj Bhavan Mosque for Namaz