PHOTO! फ्लेमिंगो पक्षांच्या जीवनशैलीत होतोय बदल! पक्षीमित्र म्हणताहेत की...

संदीप पंडित ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

भक्ष्याच्या शोधात पूर्वी युरोपातील काही पक्षी विशिष्ट्य ऋतूत भारतात येत असत. यामुळे हिवाळ्यात फ्लेमिंगोंचे दर्शन होत असे, परंतु आता या पक्षांची जीवन शैलीच बदलली असून त्यांचे कधीही दर्शन होत असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.

विरार ः भक्ष्याच्या शोधात पूर्वी युरोपातील काही पक्षी विशिष्ट्य ऋतूत भारतात येत असत. यामुळे हिवाळ्यात फ्लेमिंगोंचे दर्शन होत असे, परंतु आता या पक्षांची जीवन शैलीच बदलली असून त्यांचे कधीही दर्शन होत असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Image may contain: outdoor and nature

हिवाळ्यात वसईच्या खाडी किनारी दिसणारे हे पक्षी एप्रिलमध्ये नवी मुंबईच्या खाडी किनारी दिसले होते, तर आता ते वसई येथील गोगटे सॉल्ट येथील खाडी किनारी दर्शन देत आहेत. 

अरे बापरे... एका रात्रीत  मुंबईत आढळलेत अजस्त्र अजगर

वसईच्या खाडी किनारी युरोपातून हजारो किलोमीटर अंतर पार करून हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी येतात, परंतु यंदा मात्र फ्लेमिंगोच्या जीवन शैलीत बदल झाल्याचे दिसत असून आता हे पक्षी युरोप सोडून या ठिकाणीच स्थायिक होत असल्याचे  दिसत आहे.

Image may contain: sky, outdoor, nature and water

हिवाळ्यात येणारे हे पक्षी यंदा वसईमध्ये हिवाळ्यातील डिसेंबरमध्ये दिसल्यानंतर एप्रिलमध्ये नवी मुंबईच्या खाडी किनारी दिसले होते, तर शनिवारी (ता.27) हे पक्षी वसईमध्ये दिसल्याने हे पक्षी आता याठिकाणीच स्थायिक झाल्याचे मानले जाते.

Image may contain: sky, bird, outdoor, nature and water

भारतात त्यांना ज्या ठिकाणी त्यांचे भक्ष मिळत आहे, त्याठिकाणी ते स्थलांतरित होत असले, तरी त्यांनी आता भारतालाच आपले घर केल्याचे दिसत आहे. 

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

सर्वसाधारणपणे हिवाळ्यात हजारो किलोमीटरचे अंतर पार करून फ्लेमिंगो भारतात  येतात. त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांना कॅमेऱ्याबद्ध करण्यासाठी पक्षीप्रेमी तासनतास बसून असतात. हिवाळ्यात येणारे हे पक्षी आता कोणत्याही ऋतूत भारतात दिसत आहेत. सद्या भक्ष मिळेल त्याठिकाणी ते जात असून त्यांची जीवन शैली बदलली असल्याचे जाणवत आहे.
- अनंत कोटियन, पक्षी निरीक्षक, वसई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lifestyle of flamingo birds is changing!