डोंबिवली, कल्याण, ठाण्याच्या काही भागात बत्ती गूल

पडघा वीज उपकेंद्रावर झालेल्या बिघाडामुळे मुंबईसह उपनगरांमधला वीजपुरवठा खंडित झाला आहे.
MSEB Electricity
MSEB Electricity sakal

डघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पडघा उपकेंद्रावर झालेल्या बिघाडामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या ४०० केव्हीच्या पारेषण वाहिन्यांमध्ये बिघाड झाला आहे. तसंच ४०० केव्हीच्या पडघा आणि बबलेश्वर १ आणि २ च्या वाहिन्यांतही बिघाड झाला असून २२० केव्हीच्या पारेषण वाहिन्याही बिघडल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातल्या काही भागातला वीजपुरवठा खंडित झाला आहे.

याबद्दल बोलताना महावितरणचे अधिकारी चंद्रकांत डांगे म्हणाले की, पडघा वीज उपकेंद्रावर बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. टप्प्याटप्प्याने आता वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. तासाभरामध्ये प्रत्येक ठिकाणी वीजपुरवठा सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com