नॅशनल पार्कमधील रवींद्र सिंह आजारी 

नॅशनल पार्कमधील रवींद्र सिंह आजारी 

मुंबई - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) रवींद्र नावाचा वृद्ध सिंह आठवडाभरापासून आजारी आहे. रवींद्रचे वय अधिक असल्याने उद्यान प्रशासन त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. 

115 वर्षांच्या रवींद्रच्या डाव्या पायात पू झाला होता. तो पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी साफ केला; मात्र रक्तस्रावामुळे रवींद्रला खूप अशक्तपणा जाणवत असल्याचे उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. रवींद्रवरील उपचारांसाठी उद्यान प्रशासन मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांच्याही संपर्कात आहेत. 

या उद्यानातील शोभा नावाच्या सिंहिणीचा 2014 मध्ये मृत्यू झाल्यानंतर तेथील सिंहांची संख्या तीन झाली आहे. शोभाची जेस्पा आणि गोपा ही बछडी आता वयात आली आहेत; पण ती सख्खी भावंडे असल्याने त्यांचे मीलन करता येऊ शकत नाही. वनाधिकाऱ्यांनी गोपा आणि रवींद्र यांचे मीलन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण रवींद्र प्रजननक्षमता गमावून बसल्याने त्यास यश आले नाही. 

दरम्यान, उद्यानातील सिंह सफारीतून प्रशासनाला चांगला महसूल मिळतो. या सफारीचे विस्तारीकरणाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. उद्यानात गुजरातमधून सिंह आणण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले होते; मात्र त्यास यश आले नव्हते. 

विस्तारीकरणानंतर नवे सिंह आणा! 
सिंह सफारीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वी इतर ठिकाणाहून सिंह आणण्यात अर्थ नाही. विस्तारीकरण झाल्यानंतरच नवे सिंह आणण्यात यावेत. तोपर्यंत उद्यान प्रशासनाने महसूलवाढीसाठी अन्य पर्यायांचा विचार करावा, असे मत "रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअर (रॉ)' या संस्थेचे संस्थापक व ठाणे वन विभागाचे मानद वन्यजीवरक्षक पवन शर्मा यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com