साक्षीदारांच्या यादीसाठी पीटर मुखर्जीची याचिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - शीना बोरा हत्याकांड खटल्यातील महत्त्वाच्या गोपनीय साक्षीदारांची यादी मिळण्याच्या मागणीसाठी आरोपी पीटर मुखर्जी याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या खटल्यात "सीबीआय'ने उद्योगपती मुखर्जीला प्रमुख आरोपी बनवले आहे. त्याच्याविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले आहे.

मालमत्तेच्या वादातून पीटर आणि प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीने शीनाची हत्या करवून आणली, असा आरोप "सीबीआय'ने ठेवला आहे. "सीबीआय'ने याबाबत काही महत्त्वाच्या साक्षीदारांची यादीही न्यायालयात दाखल केली आहे. मात्र, पीटरने या आरोपांचे खंडन केले आहे. साक्षीदारांचा तपशील मिळावा, अशी मागणी करणारा अर्ज त्याने विशेष न्यायालयात केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यामुळे आता ही यादी मिळवण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. खटल्यात बाजू मांडण्यासाठी संबंधित तपशील आवश्‍यक आहे, असा दावा त्याने याचिकेत केला आहे. यावर लवकरच सुनावणी होईल.

Web Title: List of Witnesses petition for peter mukerjea