विज्ञान साहित्य - काळाची गरज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली,  - विज्ञान साहित्य ही काळाची गरज आहे. नवनवीन वैज्ञानिक शोधांमुळे आपल्या जीवनात बदल घडत असतात. तसेच विज्ञानातून चांगले समाजप्रबोधन होऊ शकते. त्यामुळे सिद्धहस्त साहित्यिकांनी विज्ञान कथा लिहाव्यात, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विज्ञान कथालेखक जयंत नारळीकर यांनी केले.

शं. ना. नवरे व्यासपीठावर करण्यात आलेल्या सन्मानाला उत्तर देताना नारळीकर बोलत होते. साहित्य संमेलनाच्या प्रथेप्रमाणे साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल देण्यात येणाऱ्या सन्मानासाठी यंदा विज्ञान कथालेखक जयंत नारळीकर व साहित्याला बोलक्‍या व अर्थपूर्ण मुखपृष्ठांचा साज चढवणारे ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांची निवड करण्यात आली होती. या वेळी रसिकांशी संवाद साधताना अनेक उदाहरणे देऊन विज्ञानाचे आपल्या जीवनातील महत्त्व नारळीकर यांनी स्पष्ट केले. 

स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते नारळीकर आणि ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार स्वीकारल्याबद्दल महामंडळातर्फे कृतज्ञता व्यक्त करताना श्रीपाद जोशी म्हणाले, की विज्ञान कथेला व वैज्ञानिक साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे नारळीकर व साहित्याचा संपूर्ण आशय आपल्या मुखपृष्ठाद्वारे सहजगत्या साकारणारे कलाकार ठाकूर यांच्या साहित्यसेवेसाठी घेतलेली ही दखल आहे. 

Web Title: literature Science