अग्निशमन दलातील जवानांना आता लाईव्ह प्रशिक्षण; अत्याधुनिक केंद्र उभारणार

fire brigade
fire brigadesakal media

मुंबई : अग्निशमन दलाचे (fire brigade officers ) अधिकारी, जवानांना आता लाईव्ह प्रशिक्षण (live training) मिळणार आहे. मुंबई अग्निशमन दल (Mumbai fire brigade) यासाठी कांदिवली येथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र (Modern training center in Kandivali) उभारणार आहे. या केंद्रात सिम्युलेटर (simulator in center) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जवानांना आपात्तीचे लाईव्ह प्रशिक्षण घेता येता येणार आहे. (Live training for fire brigade authorities as modern training center availability in Kandivali)

fire brigade
सरकारकडून विनाअनुदानित शाळांची उपेक्षा!

अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रशिक्षणात आतापर्यंत पिढ्यान पिढ्याच्या पध्दतीने प्रशिक्षण दिले जाते. कवायती, शिडीवर चढणे, शिडीवरुन उतरणे, उंचावरुन उडी मारणे, पुरपरिस्थितीत बचाव कार्य असे प्रशिक्षण दिल जाते. मात्र, आता अत्याधुनिक पध्दत येणार आहे. कांदिवली येथील ठाकूर व्हिलेट येथील प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रात नेहमीच्या पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाईलच त्याचबरोबर अत्याधुनिक पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाईल. आग लागल्यानंतर धूर निर्माण होतो तशी परिस्थिती या सिम्युलेटर मध्ये निर्माण करण्यात येईल. त्यातून बचाव कार्याचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच आगीच्या वेळी तापमानही मोठ्या प्रमाणात वाढते त्याच पध्दतीची वातावरण निर्मीती केली जाईल असे सांगण्यात आले.

fire brigade
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा; नगरसेवक भिडले

‘प्रशिक्षणात घटनास्थळी असलेली परिस्थिती निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण अधिक शास्त्रोक्त होईल. त्यातून बचाव कार्य अधिक वेगाने होईल. तसेच,घटना स्थळाच्या परिस्थितीची जाणीव प्रशिक्षणात मिळणार असल्याने जवानांनाही स्वरक्षण करुन बचाव कार्य करता येईल - हेमंत परब, प्रमुख अग्निशमन अधिकारी

सिम्युलेटर मध्ये काय होणार ?

- खोलीत धुर निर्माण केला जाईल. त्यातून बचाव कार्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

- आगीत जाताना श्‍वसन उपकरण वापरावे लागते. ते अंगावर घेऊन बचाव कार्याचे प्रशिक्षण मिळेेल.

- श्‍वसन उपकरणाच्या मदतीने 36 ते 38 मिनीटे काम करता येते. त्यापूर्वी जवानांना बाहेर यावे लागते अन्यथा त्याच्याही जिवाला धोका निर्माण होतो. याबाबतही लाईव्ह प्रशिक्षण मिळेल.

- उष्णतेपासून कसा बचाव करावा.

- इमारत पडल्यानंतर बचाव कार्य कसे करावे.

मुंबई अग्निशमन दल हे देशातील सर्वात अद्यावत अग्निशमन दल आहे. मुंबईत मोठ्या रासायनिक कंपन्या आहेत. अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यास बचावकार्य करण्याचे विशेष प्रशिक्षण मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आले आहे. तसेच,अशा आपत्तीच्या वेळी वापरण्यासाठी हॅजमॅट हे बचाव वाहानही अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहे.

बचावासाठी मास्टर प्लान

महानगरपालिकेने अग्निशमन दलाच्या बचाव कार्यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. सध्या अग्निशन दलाच्या रिस्पॉन्स टाईम 20 मिनिटांवरुन ६ मिनिटांवर आण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याच्या 35 अग्निशमन केंद्रांसह 18 मिनी फायर स्टेशन सुरु करण्यात येत आहे. तसेच, लहान वाहानांसह फायर बाईकही ताफ्यात दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com